देशात करोना रुग्णांची संख्या होतेय कमी, अॅक्टिव्ह रुग्णही घटले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 4, 2021

देशात करोना रुग्णांची संख्या होतेय कमी, अॅक्टिव्ह रुग्णही घटले

https://ift.tt/3ymX1pQ
नवी दिल्लीः भारतात करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत ( ) आहे. रविवारी ४३ हजार नवीन रुग्ण आढळल्याचे समोर आले. गेल्या ५० दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविरारी गेल्या २४ तासांतील करोना रुग्णांसंबंधीची आकडेवारी जारी केली. यानुसार ४३,०७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान ९५५ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत ४ लाखाहून अधिक नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. करोनाचे नवीन रुग्ण कमी होण्यासोबतच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. भारतात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ४,८५,३५० पर्यंत आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ५२, २९९ रुग्ण बरे झाले. गेल्या ५२ दिवसांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे होण्याचा दर हा वाढून ९७.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आठवड्याची संसर्गाची टक्केवारी ही २.४४ टक्के आहे तर रोजचा संसर्ग दर हा २.३४ इतका आहे. ही टक्केवारी गेल्या २७ दिवसांपासून ५ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशात लसीकरण मोहीमेने वेग घेतल्याचं समोर आलं आहे. सरकारी आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत ६३,८७,८४९ जणांना डोस देण्यात आला. आतापर्यंत देशात एकूण ३५,१२ कोटी नागरिकांनी लस घेतली आहे. चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. एकूण ४१.८२ कोटी चाचण्या झाल्या आहेत.