भोपाळः काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे हे केंद्रीय मंत्री झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे नागरी हवाई वाहतूक मंत्री झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे नागरी हवाई वाहतूक मंत्री झाल्यानंतर अनेक जणांना त्यांचे दिवंगत वडील यांची आठवण झाली. कारण माधवराव शिंदे १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळालत नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. त्यापूर्वी ते दिवंगत प्रंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळातही होते. पण माधवराव यांना मंत्रिमंडळात न घेण्याचा सल्ला इंदिरांनी आधीच दिला होता. हे बाब अतिशय कमी लोकांना माहिती आहे. पत्रकार रशिद किडवई यांनी या घटनेबद्दल आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. दिवंगत काँग्रेस नेत्या आणि गांधी घराण्याच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या माखनलाल पोतेदार यांनी दिलेल्या माहितीवरून किडवई यांनी ही घटना उजेडात आणली. ३१ ऑक्टोबर १९८४ ला आपल्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी यांनी आपले पुत्र राजीव गांधी आणि अरुण नेहरू यांना बोलावले होते. राजीव गांधी हे त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि अरुण नेहरू हे ताकदवर नेता होते. इंदिरा गांधी यांनी चर्चेत दरम्यान राजीव गांधींना काही सूचना केल्या होत्या. त्या म्हणाल्या दोन कामं अशी आहे जी तू अजिबात करू नको. पहिलं अमिताभ बच्चनना राजकारणात आणू नको. आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान झालास तर माधवराव शिंदेंना आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री बनवायचं नाही, असं इंदिरा राजीवना म्हणाल्या होत्या. फोतेदार यांनी आपल्या आत्मचरित्रा या घटनेचा उल्लेख केला आहे. पण इंदिरांनी त्याबद्दल कुठलेही पुरावे दिले नाहीत. फोतेदार यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे हे लिहिलं होतं की खरचं असं घडलं होतं, याबाबत कुणीही दाव्याने सांगू शकत नाही. पण इंदिरा गांधींनी दिलेला एकही सल्ला राजीव गांधींनी ऐकला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींनी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यात त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा मोठा पराभव केला होता. निवडणुकीतील विजयानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. त्यांनी माधवराव शिंदेंना आपल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं रेल्वे मंत्रिपद दिलं. इथूनच माधवराव हे देशात लोकप्रिय झाले. त्यांनी शताब्दी एक्स्प्रेस सारख्या वेगवान गाड्या आणि कंप्युटराइज्ड तिकीट यंत्रणेची सुरवात करून मध्यम वर्गीयांना आपलसं केलं होतं.