श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक ( ) झाली. या चकमकीत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात ( ) आलं. पण या चकमकीत दोन झाले. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LoC) दोन चकमकीत ठार झाले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले. या भागात शोध मोहीम राबवली जात आहे, असं लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादलमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी ये-जा करत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कराने २९ जूनला व्यापक शोध मोहीम राबवली. ८ जुलैला देण्यात आलेली माहिती पक्की असल्याचं समोर आलं. यानंतर गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना दहशवादी दादलच्या जंगलात आढळून आले. यानंतर चकमक उडाली, असं त्यांनी सांगितलं. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. तसंच ग्रेनेडही फेकले. या चकमकीत दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. तर दोन जवान गंभीर जखमी झाले होते, असं ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एका टॉप कमांडरचाही समावेश आहे. तर गेल्या ७ दिवसांमध्ये १२ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.