उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 9, 2021

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक

https://ift.tt/3jVpzTz
लखनऊ : उत्तर प्रदेशचे कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर यांच्या निधनाची अफवा समोर येत असतानाच काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कल्याण सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस केलीय. पंतप्रधानांनी कल्याण सिंह यांच्या नातवाशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. याबद्दल पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आलीय. तसंच पंतप्रधान मोदींनी कल्याण सिंह लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केलीय. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर कल्याण सिंह यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, गंभीर स्थिती लक्षात घेता त्यांना एसपीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथे 'क्रिटिकल केअर मेडिसिन' विभागाच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कल्याण सिंह यांची भेट घेऊन त्यांची प्रत्यक्ष विचारपूसही केली होती. कल्याण सिंह यांची भेट घेण्यासाठी नड्डा विमानतळाहून थेट एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल झाले होते.