मुसळधार पावसानंतर अतिआत्मविश्वासाने झाला घात; पूल ओलांडताना २ जण गेले वाहून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 9, 2021

मुसळधार पावसानंतर अतिआत्मविश्वासाने झाला घात; पूल ओलांडताना २ जण गेले वाहून

https://ift.tt/2TSkOzx
: जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. काही भागांमध्ये तर पुरासारखी स्थितीही निर्माण झाली. या पावसानंतर दुथडी भरून वाहत असलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे २ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी नदीवरील छोटा पूल ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. अण्णा पुरुषोत्तम निंबाळकर (वय ५०) आणि गुड्डू मधुकरराव शिंदे असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील रहिवासी आहेत. सुगीचे दिवस असल्याने हे दोघेही शेतीचे साहित्य आणण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. पुरात वाहून गेलेल्या पुरुषोत्तम निंबाळकर यांना दोन मुले तर शिंदे यांना एक मुलगा एक मुलगी आहे. नदीच्या पलीकडे दुचाकी ठेऊन पूल ओलांडणाऱ्या दोघांनाही पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत उतरताच दोघेही . घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक आसिफ रजा शेख, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नायब तहसीलदार संजय भुजाडे, तलाठी सुरज साजदकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता. या घटनेची नोंद कळमेश्वर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरवरून आलेल्या रेस्क्यू टीमने दुपारनंतर बराच वेळ शोधकार्य केले. मात्र सायंकाळपर्यंत या दोघांचा कोणताही पत्ता बचावपथकाला लागला नाही.