मुंबईतील करोना रुग्णांच्या दुपटीचा दर ५ वर्षांवर; काय आहे ताजी स्थिती? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 15, 2021

मुंबईतील करोना रुग्णांच्या दुपटीचा दर ५ वर्षांवर; काय आहे ताजी स्थिती?

https://ift.tt/3mhV0ZB
मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येत किचिंतशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात एकूण २६२ बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २८५ इतकी होती. तर गेल्या २४ तासांत एकूण ३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी वाढली असून काल बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २६१ इतकी होती. तर, आज एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १७ हजार ७७५ इतके रुग्ण बरे झाले आहेत. याबरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्ण, म्हणजेच ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ हजार ८७९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १ हजार ८६० दिवसांवर पोहोचला असून कोविड दरवाढीचा दर (७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट) हा ०.०४ टक्के इतका आहे. मुंबई आज झाल्या एकूण ३६ हजार ४७१ चाचण्या मुंबईत एकूण ३६ हजार ४७१ इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८६ लाख १६ हजार ५५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासांत बाधित रुग्ण - २६२ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ३२३ बरे झालेले एकूण रुग्ण - ७१७७७५ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७% एकूण सक्रिय रुग्ण- २८७९ रुग्ण दुपटीचा कालावधी- १८६० दिवस कोविड वाढीचा दर (०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट)- ०.०४ % क्लिक करा आणि वाचा-