लोकल सर्वांसाठी सुरू; समोर आली ही महत्त्वाची माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 19, 2021

लोकल सर्वांसाठी सुरू; समोर आली ही महत्त्वाची माहिती

https://ift.tt/3z0k8aL
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना अर्थात, लसधारकांना लोकलमुभा मिळाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर साडेतीन लाख प्रवाशांची भर पडली आहे. वाढीव लोकल फेऱ्यांमुळे गर्दी विभागली गेली असून सध्या रेल्वे स्थानकांतील गर्दी पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मध्य रेल्वेवर १,६८६ तर पश्चिम रेल्वेवर १,३०० लोकलफेऱ्या होत आहेत. ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत मध्य रेल्वेवर रोज सरासरी २० हजार मासिक पास देण्यात आले. पश्चिम रेल्वेवर रोजची सरासरी ९ हजार ४१८ पासची आहे. करोना लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या आणि महापालिकेकडून ओळख पडताळणी पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच सध्या लोकलमुभा देण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाले. सोमवारी आणि मंगळवारी सर्वाधिक म्हणजे एकूण ५१ हजार २२७ पासची विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. गेल्या आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अर्थात, शुक्रवारी १७ लाख प्रवासीसंख्या नोंदवण्यात आली. मंगळवारी ही संख्या साडेअठरा लाखांपर्यंत पोहोचली, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी १२ लाख ४० हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मंगळवारी हा आकडा १४ लाख ४२ हजारांवर पोहोचला. एकच लसमात्रा घेतलेले प्रवासी रेल्वे स्थानकांत तसेच, दिव्यांगांच्या डब्यात घुसखोरी करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन पडताळणी केलेल्या केवळ लसधारक प्रवाशांनाच मासिक पास देण्यात येत आहे.