पाकिस्तानच्या खेळाडूचं डोकं ठिकाणावर आहे का... काश्मीर लीगबद्दल बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 11, 2021

पाकिस्तानच्या खेळाडूचं डोकं ठिकाणावर आहे का... काश्मीर लीगबद्दल बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला...

https://ift.tt/3CuN8tj
नवी दिल्ली : पाकिस्तानची काश्मीर प्रीमिअर लीग सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आता तर पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने या लीगबाबत बीसीसीआयलाच काही गोष्टी सुनावल्या आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने आात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मीर हा आमचाच एक भाग आहे, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा हा एक प्रयत्न असल्याचे आता समोर आले आहे. पाकिस्ताने भारताच्या विरोधात जाऊन आता काश्मीर प्रीमिअर लीग सुरु करण्याचे ठरवले आहे. पण बीसीसीआयने याबाबत कडक पवित्रा घेतला आहे. या लीगसाठी बीसीसीआयने कोणताही अडथळा निर्माण करू नये. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यामुळेच बीसीसीआयने या लीगला पाठिंबा द्यायला हवा, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामराम अकमलने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कामरान अकमलचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. कारण पाकिस्तानला ही लीग सुरु करण्याची कोणतीही गरज नव्हती. कारण त्यांची पाकिस्तानची ट्वेन्टी-२० लीग सुरु आहे. ही लीग सुरु करून पाकिस्तानेन वाद उकरून काढायचे ठरवलेले दिसत आहे. कारण या लीगमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होऊ शकतो आणि त्याचे परीणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आता आयसीसीमध्ये आपल लक्ष घालणार की नाही, हा प्रश्नदेखील क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज हा पाकिस्तानच्या काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता, त्याची निवडही या लीगमध्ये करण्यात आली होती. पण त्यानंतर बीसीसीआयने आपल्याला भारतात पाय ठेवू देणार नसल्याचे धमी दिली, असे गिब्जने सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मोठा धक्का बसला होता. पण या धमकीचा मोठा परीणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या धमकीनंतर आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारनेही या लीगमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता या लीगमध्ये कोणते परदेशी खेळाडू खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.