आधीच 'डेंजर झोन'मध्ये असलेल्या 'या' जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 11, 2021

आधीच 'डेंजर झोन'मध्ये असलेल्या 'या' जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव

https://ift.tt/3fRrTIq
कोल्हापूर: कोल्हापुरातील एक महिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिच्यावर उपचार झाले. ती बरी होवून घरी परतली. या घटनेला दोन महिने उलटले आणि आता या महिलेला विषाणूची लागण झाली होती, असे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा हा पहिला रुग्ण असून रुग्ण सापडलेल्या भागात तातडीने उपाययोजना राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक यांनी या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक घेतली. ( ) वाचा: एप्रिल महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर सुरू आहे. मे ते जुलै या तीन महिन्यात रोज हजारावर रुग्ण आढळत होते. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या कोल्हापुरात आढळत असल्याने चिंताजनक वातावरण तयार झाले होते. कोविड पॉझिटिव्हिटी दरही दोन महिने दहा ते पंधरा टक्के होता. यामुळे टास्क फोर्स, केंद्रिय समितीने भेट देवून पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर डेल्टा प्लस विषाणूने कोल्हापुरात शिरकाव करू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, तो तीन महिन्यापूर्वीच येथे पोहचल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. वाचा: मे महिन्यात ज्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील काही स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये शहरातील एका ६२ वर्षीय महिलेच्या स्वॅबचा समावेश होता. २६ मे रोजी पाठविण्यात आलेल्या या स्वॅबचा अहवाल दोन दिवसापूर्वी कोल्हापूर महापालिकेस मिळाला. त्यात सदर महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ही महिला बरी होवून दोन महिने उलटून गेले आहेत. घरीच राहून तिने उपचार घेतले. ती बरी झाली. आता तिचा अहवाल आल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. या अहवालानंतर तातडीने महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आरोग्य विभागातील विविध डॉक्टरांनी त्या महिलेच्या घराच्या परिसरात भेट देवून पाहणी केली. तिच्या घराच्या परिसरात व तिच्या संपर्कात आलेल्या भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जास्त दिवस करोना बाधित असलेल्या रुग्णांची डेल्टा प्लससाठी तपासणी करण्यात आली. शहरात आढळलेला डेल्टा प्लस रुग्ण बरा झाला असला तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे - डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, वाचा: