
नवी दिल्लीः टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने ( ) रविवारी भारतासाठी रौप्य पदक जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये ( ) भारताचे हे पहिले पदक आहे. टेबल टेनिसमधील क्ला ४ एकेरी गटातील अंतिम सामन्यात भाविनाचा सामना हा चीनच्या झोउ यींगशी झाला. ७.११, ५-११, ६-११ असा भाविनाचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानवं लागलं. भाविनाबेनने पहिल्या सेटमध्ये झोउ यींगला चांगली लढत दिली. पण चीनच्या माजी सुवर्णपदक विजेत्याने यींगने भारतीय खेळाडूला नंतर संधी मिळवून दिली नाही. कारण सूर सापडल्यानेमुळे तिने सामन्यात सहज विजय मिळवला. भाविना यांनी रौप्य पदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. शानदार कामगिरीनंतर भाविनावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. असामान्य भाविना पटेलने पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला! त्यांनी रौप्य पदक जिंकलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे आणि तो अधिक तरुणांना खेळांकडे आकर्षित करेल, असं पंतप्रधान मोदी ट्वीटमधून म्हणाले. पंतप्रधान मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधी, विरेंद्र सहवाग, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासह अनेकांनी भाविनाला शुभेच्छा दिल्या. भाविना ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे. तिचे वडील हसमुखभाई पटेल यांचं एक छोटसं दुकान आहे. भाविना पदक जिंकेल, असं कुणाला वाटलंही नव्हतं. पण तिने शानदार कामगिरी करत पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.