
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदी हे ''मधून जनतेशी संवाद साधत आहे. वाचा अपडेट्स... - कुठल्याही कुटुंबात जा, तरुण परंपरा बाजूल सारत स्टार्ट-अप सुरू करत आहेत. तरुण धोका पत्करण्यास तयार आहेत, स्टार्ट-अप संस्कृती विस्तारत आहे. यात त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे: पंतप्रधान मोदी - आजच्या तरुणाला रुळलेल्या मार्गावर चालायचे नाही. त्याला नवीन मार्ग तयार करायचे आहेत. नव्या क्षेत्रात पाऊल टाकायचे आहे. नवे लक्ष्य आणि नव्या दमाने तरुण दिवस रात्र मेहनत करत आहेत: पंतप्रधान मोदी - मेजर ध्यानचंद यांचा आत्मा जिथे असेल तिथे त्यांना खूप आनंद होईल. मेजर ध्यानचंद यांनी जगात भारताची हॉकीचा डंका वाजवला. ४ दशकांनंतर भारताला या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये पदक मिळाले: पंतप्रधान मोदी - देशाच्या मुला -मुलींमध्ये खेळाचे आकर्षण दिसून येत आहे, पालकही आनंदी असतात जेव्हा त्यांची मुलं खेळात पुढे जातात. मेजर ध्यानचंद यांना हीच खरी श्रद्धांजली: पंतप्रधान मोदी