'अनिरुद्ध- अरुंधती पुन्हा कधी असे हसतील' मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 30, 2021

'अनिरुद्ध- अरुंधती पुन्हा कधी असे हसतील' मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

https://ift.tt/3Dum65F
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका '' प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत दाखवण्यात येणारं प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं लाडकं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर कथेच्या ओघात प्रत्येक प्रेक्षकाने सगळ्यासाठी संजनाला जबाबदार धरलं. परंतु, मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते यांनी पोस्ट करत यात खुद्द अनिरुद्धची चूक असल्याचं म्हटलं आहे. मिलिंद यांनी मधुराणी प्रभुलकर सोबतचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं ,'अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील माहीत नाही. खरं तर त्यांचं नातं खूप सुंदर होतं. त्यांचं नातं वेळेसोबत फुलत गेलं. २५ वर्ष हा एखाद्या नात्यासाठी खूप मोठा कालावधी असतो. जर अनिरुद्ध त्याच्या नात्यासोबत प्रामाणिक राहिला असता तर अनिरुद्ध आणि अरुंधती यांचं आयुष्य खूप सुंदर आणि कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरू राहिलं असतं. आपल्या तीन मुलांसोबत ते दोघेही उत्तम आयुष्य जगले असते. त्यांच्या घटस्फोटासाठी अनेकांनी संजनाला जबाबदार धरलं पण खरा दोषी अनिरुद्ध आहे. तो खूप बेजबाबदार आणि गर्विष्ठ आहे. त्याला समोरचा केकही तसाच हवाय आणि तो खायचा पण आहे. त्याने संजनाचं आयुष्यदेखील खराब केलं. त्या दोघीही अनिरुद्धमुळे सगळं सहन करत आहेत.' पुढे मिलिंद यांनी लिहिलं, 'पण दुसऱ्या बाजूने पाहायचं तर अरुंधती आणि संजना दोघीही लढवय्या आहेत. कार्यक्रमही तेच सांगतो की कोणत्याही पुरुषाने महिलेला कधीही गृहीत धरू नये. मग ती साधी भोळी, कमी शिकलेली बाई असेल तरीही वेळ पडल्यावर ती दुर्गेचं रूप घेऊ शकते आणि वाईटासोबत लढू शकते. मालिकेतून हा संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की मालिकेचे संवाद लिहिणाऱ्या देखील दोन महिला आहेत. आम्ही महिलांना सशक्त आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायला सांगतोय. मला अनिरुद्धचं पात्र साकारताना अभिमान वाटतोय जो आधी अरुंधतीसाठी पंचिंग बॅग होता आता संजनासाठी होणार आहे. समोरच्याची चांगली बाजू दाखवण्यासाठी कुणाला तरी वाईट व्हावं लागतं. मी तो अनिरुद्ध साकारलाय ज्याच्यासाठी मला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. आणखी काय बोलावं.' मिलिंद यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.