पॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलुट; योगेश कठुनियाला रौप्यपदक - Times of Maharashtra

Monday, August 30, 2021

demo-image

पॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलुट; योगेश कठुनियाला रौप्यपदक

https://ift.tt/2WuxaPg
photo-85755702
टोकियो: जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी भारताने एकापाठोपाठ एक दोन पदक जिंकली. सोमवारी सकाळी प्रथम नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकल्यानंतर थाळीफेकमध्ये योगेश कठुनियाने रौप्यपदक जिंकले. वाचा- योगेशने ४४.३८ इतक्या लांब थाळी फेकली आणि पदक जिंकले. सुरुवातीला योगेश सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता. पण ब्राझीलच्या खेळाडूने ४४.५७ इतक्या लांब थाळी फेकत आघाडी घेतली. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे चौथे पदक आहे. आतापर्यंत भारताने १ सुवर्ण, ३ रौप्य पदकांची कमाई केली आहे. पदकतालिकेत भारत ५ पदकांसह ३३व्या स्थानावर आहे. 85755747 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन काल रविवारी भारताच्या टेबलटेनिसपटू भविनाबेन पटेलने रौप्यपदकाची कमाई केली, तर अॅथलेटिक्समध्ये निशादकुमारने लांबउडी टी ४७ या प्रकारात आशियाई विक्रमासह रौप्यपदकावर नाव कोरले होते. रविवारी भारताला आणखी एक पदक मिळाले होते. पण ते पदक रोखण्यात आले आहे. थाळीफेकमध्ये भारताच्या विनोद कुमार यांनी १९.९१ मीटर लांब थ्रो फेकला आणि आशियाई विक्रमासह तिसरे स्थान मिळवले. काही देशांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे हे पदक रोखण्यात आले आहे.

Pages