माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 'या' मंत्र्याची केली तक्रार; म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 10, 2021

माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 'या' मंत्र्याची केली तक्रार; म्हणाले...

https://ift.tt/3Cu7xyy
यवतमाळ: काँग्रेसचे नेते यांनी यवतमाळचे पालकमंत्री यांची तक्रार थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केली. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नाहीत अशी तक्रार ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांच्या या तक्रारीमुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत. ठाकरे यांच्यासारख्या काँग्रेसमधील वजनदार नेत्याने शिवसेनेच्या मंत्र्याची तक्रार केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ही यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला दु्य्यम दर्जाची वागणूक देत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. या जिल्ह्यात शिवसेनेचा फक्त एक आमदार आहे. असे असतानाही शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान न मिळाल्यानेही काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात आहे. क्लिक करा आणि वाचा- 'आघाडीत बिलकुल धुसफूस नाही' महाविकास आघाडीत धुसफूस आहे हे वृत्त मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले आहे. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची धुसफूस नसल्याचे ते म्हणाले. घरातही दोन भावांमध्ये भांडण होत असते. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार आहे, असे सांगतनाच मागच्या सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये दररोज भांडण होत होते, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले आहे. क्लिक करा आणि वाचा- यवतमाळचा गड परत मिळवणार यवतमाळ हा काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो. मात्र हा गड आता काँग्रेसच्या हातात राहिलेला नाही. त्यामुळे हा गड परत मिळवण्याचा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेसने कार्यक्रमाची आखणी केली असून शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत आढावा बैठकांचे सत्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच विविध मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-