
मुंबई: पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या विभागातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्यावतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री यांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी दिली. ( ) वाचा: महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात प्रवीण दरेकर यांनी दौरा केला असून तेथील नेमकी स्थिती त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. अनेक भागातील रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत, त्यामुळे सर्व रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी गडकरी यांना सांगितले. दिल्लीमध्ये नितिन गडकरी यांच्या भेटीत एक सविस्तर निवेदन दरेकर यांनी सादर केले आहे. कोकणातील उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांसाठी निधी देण्याची विनंती यावेळी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. त्यावर गडकरी यांनी ही विनंती मान्य करीत कोकणासाठी केंद्र सरकारच्यावतीने १०० कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गडकरी यांच्या या सहकार्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, अतिवृष्टीचा मोठा तडाखा कोकण भागाला बसला. , खेड या शहरांत पुराचे पाणी शिरून हाहाकार उडाला. चिपळूणमध्ये तर पुराच्या पाण्याने २५ फूट इतकी उंची गाठली होती. या पुराच्या तडाख्यात रस्ते खचून, पूल तुटून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अनेक भागांचा संपर्क तुटला होता. मुंबई - गोवा महामार्गही यादरम्यान पूर्णपणे ठप्प होता. याच अनुषंगाने दरेकर यांनी नितीन गडकरी यांना निवेदन दिले असून केंद्राची मदत मिळाल्यास रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीला हातभार लागणार आहे. वाचा: