सोने-चांदीला तेजीची झळाळी ; सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत झाली प्रचंड वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 29, 2021

सोने-चांदीला तेजीची झळाळी ; सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत झाली प्रचंड वाढ

https://ift.tt/2Wxq3pc
मुंबई : करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू खुली होत आहे. सणासुदीच्या हंगामात सराफांनी सोने खरेदीवर भर दिल्याने कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली आहे. कमॉडिटी बाजारात सोने ३०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी महागली. नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसला होता. दोन्ही धातूंच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली होती. मात्र शुक्रवारच्या सत्रात सोने आणि चांदी तेजीने झळाळून निघाले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव ४७५५७ रुपये आहे. त्यात ३२० रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७५८२ रुपयांपर्यंत वाढला होता. एमसीएक्सवर शुक्रवारी बाजार बंद होताना एक किलो ६४०७२ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात १०२८ रुपयांची वाढ झाली. Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६५० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७६५० रुपये झाला आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७१० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९४० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४०८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७११० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८१० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.१ टक्क्याने वधारला आणि तो १७९३.६८ डॉलर प्रती औंस झाला. यूएस गोल्ड फ्युचर्स ०.१ टक्क्याने वधारून १७९६.७० डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव मात्र २३.५४ डॉलर प्रती औंस इतका आहे. वर्षभरात झाली मोठी घसरण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. तर चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात जवळपास १७००० रुपयांची घसरण झाली आहे. कमॉडिटी बाजारात सोने अजून विक्रमी पातळीच्या तुलनेत ९००० रुपयांनी स्वस्त आहे.