सांगलीत २० वर्षीय मुलीची आत्महत्या; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 11, 2021

सांगलीत २० वर्षीय मुलीची आत्महत्या; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

https://ift.tt/2XklYoZ
: मिरज इथं विषारी इंजेक्शन घेऊन तरुणीने आत्महत्या ( Girl Suicide) केल्याची घटना घडली आहे. मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती चिट्ठी ताब्यात घेतली आहे. मराठे मिल चाळ येथील रमामाता आंबेडकर कॉलनीत ही घटना घडली आहे. आम्रपाली सतीश कांबळे (वय २० ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात परिचारका होती. गांधी चौक पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आम्रपाली कांबळे या तरुणीचे ओळखीतील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकारही दिला होता. मात्र काल तिने राहत्या घरी विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. मुलीने विषारी इंजेक्श टोचून घेतल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालाचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यातून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याबाबत मिरज गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.