आयपीएलपूर्वीच भारताचा खेळाडू 'क्लिन बोल्ड'; गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्न बेडीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 21, 2021

आयपीएलपूर्वीच भारताचा खेळाडू 'क्लिन बोल्ड'; गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्न बेडीत

https://ift.tt/3z4NcO1
: हैदराबाद : आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये पुढील महिन्यापासून सुरू होईल. काही संघ यूएईमध्ये दाखलही झाले आहेत. आयपीएलला सुरवात होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या एका खेळाडूनं त्याच्या आयुष्याची नवी इनिंगही सुरू केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने सोशल मीडियातून याबाबती माहिती दिली. हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मानं त्याची मैत्रीण ताशा सात्विकशी लग्न केलं आहे.सनरायझर्स हैदराबादने संदीप शर्मा आणि ताशा सात्विकच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ''सनरायझर्स हैदराबाद कुटुंबात एका खास व्यक्तीचं आगमन, मोठ्या भागीदारीसाठी श्री आणि सौ शर्मा यांचं अभिनंदन.” संदीप आणि ताशा यांनी लग्नावेळी दाक्षिणात्य पोशाख परिधान केला होता. संदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता घातला होता, तर ताशाने केशरी-लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. पारंपरिक दागिने आणि गजरा घातलेली नताशा फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. संदीपची पत्नी ताशा ही बंगळूरची रहिवासी असून ती ज्वेलरी डिझायनर आहे. तसेच ती ब्लॉगही लिहते. तीन वर्षांपूर्वी दोघांनी साखरपुडा उरकून घेतला होता. २०१८च्या आयपीएलमध्ये संदीपसाठी हैदराबाद संघाने ३ कोटी रुपयांची बोली लावली होती. आणि तेव्हापासून तो हैदराबाद संघाचा एक भाग आहे. त्याने आतापर्यंत ३९ विकेट घेतल्या आहेत. भारतात झालेल्या आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात संदीपने हैदराबादकडून तीन सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १०९ धावा देत फक्त एक विकेट घेतली आहे. लग्नानंतर त्याचं नशीब किती चमकतं हे आता पाहावं लागेल.