'या' फोटोतल्या नराधमांनी केलं भयंकर कृत्य, घटना वाचून तुम्हालाही राग आवरणार नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 14, 2021

'या' फोटोतल्या नराधमांनी केलं भयंकर कृत्य, घटना वाचून तुम्हालाही राग आवरणार नाही

https://ift.tt/3m01ETR
जालना : अनाथ अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर बलात्कार करून त्याची शुटींगही करण्यात आली. बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावातील ही घटना आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या अनाथ अल्पवयीयन मुलींवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याच्या दुर्दवी घटना बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावात घडली आहे. या दोन तरुणांनी मुलीला शेतात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार करून त्याची शुटींग मोबाईल कॅमेऱ्यात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे अशी या दोन नराधाम तरुणांची नाव असून शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही अनाथ असलेली मुलगी लक्ष्मणनगर तांडा या गावकडे जात असताना सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे या नराधमांनी ती एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बलात्कार केला. या अल्पवयीन अनाथ मुलीला शेजारच्या शेतात फरफटत नेऊन तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. मुलीने या घटनेची वाच्यता करू नये म्हणून या नराधमाने मोबाईल कॅमेऱ्यात शुटींग करून बदनाम करण्याची धमकी दिली. या दुर्दवी घटनेनंतर रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या मुलीची अवस्था पाहून नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना ताब्यात घेत. त्यांच्या जवळ असलेला मोबाईल जप्त करत त्यांच्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने परिसरात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.