ट्विटरवर #BoycottRadhikaApte ट्रेंड, युझर्स म्हणाले.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 14, 2021

ट्विटरवर #BoycottRadhikaApte ट्रेंड, युझर्स म्हणाले..

https://ift.tt/3xLJOpS
मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री हिने चाकोरीबाहेरील सिनेमांमध्ये काम करत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे अनेक सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावजले गेले आहेत. अशी या प्रसिद्ध अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर राधिका आपटेवर बहिष्कार घालण्याची मागणी ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली आहे. राधिका आपटेमुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होत असल्याचा आरोपही अनेक युझर्सने तिच्यावर केला आहे. बहिष्कारामागचे कारण राधिका आपटेने 'पार्च्ड', 'हंटर' या सिनेमांमध्ये राधिकाने न्यूड सीन दिले आहेत. त्यातील पार्च्ड हा २०१६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील काही बोल्ड सीनचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे राधिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही युझर्सने 'राधिकामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होत आहे,' असा आरोप केला आहे. राधिकाच्या या बोल्ड फोटोंमुळे तिला ट्रोल केले जात आहे. अनेक युझर्सने या फोटोंवर आक्षेप नोंदवला आहे. हिंदी सिनेमांमधून अशा पद्धतीने बोल्ड सीन दाखवले जातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होतेच. त्याचप्रमाणे देशात अश्लिल सिनेमा पाहण्याचे प्रमाणही वाढते, असे मत काही युझर्सनी व्यक्त केले आहे. तर काहीजणांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचाही उल्लेख केला आहे. अश्लील चित्रफित प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा प्रकरणावरून हिंदी सिनेमासृष्टीतील कलाकारांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल काहींनी केला आहे. दरम्यान, राधिका आपटेच्या कामाबद्दल सांगायचे तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'रात अकेली है' या सिनेमात ती दिसली होती. या सिनेमात राधिकाबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी देखील होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता राधिका 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.