video : सामना जिंकता आला नसला तरी विराट कोहलीने हार मानली नाही, पाहा आता केलं तरी काय... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 10, 2021

video : सामना जिंकता आला नसला तरी विराट कोहलीने हार मानली नाही, पाहा आता केलं तरी काय...

https://ift.tt/3s1NOl4
नवी दिल्ली : विजयाचा घास भारताच्या अगदी तोंडाशी आला होता. पण रविवारी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही आणि भारताच्या हातून विजय निसटला. पण भारतीय संघाला विजय मिळाला नसला तरी विराट कोहलीने हा मानलेली नाही. कारण सध्याच्या घडीला कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कर्णधार विराट कोहली हा किती फिट आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण फिट राहण्यासाठी काही गोष्टी सातत्याने कराव्या लागतात, त्यामध्ये खंड पडून चालत नाही आणि हीच गोष्ट कोहली आतापर्यंत पाळत आल्याचे पाहायला मिळत आहे. कोहलीचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी पहिला कसोटी सामान संपला, पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी कोहलीने व्यायामाला मात्र विश्रांती दिलेली नाही. कोहली यावेळी वेटलिफ्टिंग करत असल्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कोहली जबरदस्त वजन उचलल्याचे पाहायला मिळत असून जेव्हा तो हे वजन उचलतो तेव्हा त्याचे दोन्ही पाय हवेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोहली यावेळी किती वजन उचलत असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाची संधी हुकली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही संघांना निम्मे निम्मे गुण देण्यात आले. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती आणि भारताकडे नऊ विकेट शिल्लक होत्या. पण हा सामना अखेर अनिर्णीत राहीला. पण भारतासाठी यानंतरही ही गोष्ट आनंददायी आहे. कारण टीम इंडियाने २००७ आणि २०१४चा अपवाद वगळता इंग्लंडमध्ये नेहमी पहिली कसोटी गमावली आहे. यामुळे या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. याचा फायदा मालिकेतील पुढील सामन्यात मिळू शकतो. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून नेमकी कशी कामगिरी होते आणि ते विजय साकारणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.