तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 21, 2021

तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी?

https://ift.tt/3zuShP8
प्रयागराजः आखाडा परिषदेचे अध्यक्ष यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शिष्य यांना अटक करण्यात आली आहे. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आनंद आणि इतर दोन शिष्यांवर आरोप केले आहेत. काही काळापूर्वी महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात वाद झाला होता. आनंद गिरी यांनी गुरू नरेंद्र गिरींवर अनेक खळबळजनक आरोप केले होते आणि निरंजनी आखाड्यातील दोन तरुण साधूंच्या मृत्यूला हत्या म्हणून संबोधले होते. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूलाही आनंद गिरी यांनी हत्या असल्याचं होतं. पण कोण आहेत हे आनंद गिरी? बघायू... आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्यातील वाद उत्तराखंडचे रहिवासी आनंद गिरी हे निरंजनी आखाड्याचे सदस्य होते. संत परंपरेचं योग्य पालन केल्याचा आणि आपल्या कुटुंबाशी संबंध कायम ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर त्यांची आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली होती. महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात दीर्घ काळापासून वाद होता. या वादाचे मूळ बाघंबरी पीठाची गादी होती, असं बोललं जातंय. आखाड्यातून हद्दपार झाल्यानंतर आनंद गिरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्यांचे गुरु महंत गिरी यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक आरोप केले. आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांच्यावर मठाची जमीन विकल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री तसेच यूपी आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. आनंद गिरींनी मागितली होती माफी आनंद गिरींचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं नरेंद्र गिरी यांनी म्हटलं होतं. आनंद गिरी सुरक्षा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक नाटक करत असल्याचं नरेंद्र गिरी म्हणाले होते. यानंतर दोघांमध्ये समेट झाला आणि आनंद गिरीने आपल्या गुरुचे पाय धरून माफी मागितली. नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरीवर लादलेले निर्बंधही मागे घेतले. देश आणि विदेशात योग शिकवणाऱ्या आनंद गिरीविरोधात २०१९ मध्ये विदेशात दोन मुलींच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद गिरी ऑस्ट्रेलियात होते. योग शिकवण्याच्या बहाण्याने विनयभंग केला अशी तक्रार तिथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी केली होती. या प्रकरणी आनंद गिरीना तुरुंगात जावे लागले. पण न्यायालयात आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याना निर्दोष सोडण्यात आलं होतं.