मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड?; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 21, 2021

मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड?; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना

https://ift.tt/3lJz87b
मुंबई: आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री यांनी आढावा घेतला. याबरोबरच संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला व संबंधितांना सूचना दिल्या. दरम्यान, लसीकरण पूर्ण झालेल्या इमारतींसाठी आदित्य यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाची सूचना केली. ( ) वाचा: पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी करोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला व महत्त्वाच्या सूचना केल्या. महिलांच्या लसीकरणाबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डीसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वाचा: मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून आदित्य ठाकरे म्हणाले, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक यांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत माहिती दिली. वाचा: