अफगाणिस्तान: बंदुकीच्या धाकावर भारतीय व्यावसायिकाचे अपहरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

अफगाणिस्तान: बंदुकीच्या धाकावर भारतीय व्यावसायिकाचे अपहरण

https://ift.tt/3kbzMer
काबूल: अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने अल्पसंख्यक व परदेशी नागरिकांच्या सुरक्षितेबाबत मोठी आश्वासने दिली होती. मात्र, ही आश्वासने हवेतच विरली आहेत. काबूलमध्ये बंदुकीच्या धाकावर एका भारतीय व्यावसायिकाचे अपहरण झाल्याचे वृत्त आहे. भारतीय व्यावसायिकाचे अपहरण करणारे तालिबानी होते असे म्हटले जात आहे. या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असून या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंढोक यांनी सांगितले की, काबूलमध्ये अफगाण वंशाचे भारतीय व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण करण्यात आले. व्यावसायिकाचे नाव बंसरी लाल अरेन्देही आहे. बंसरी हे शीख समुदायातील आहेत. बंसरी यांचे काबूलमध्ये औषध उत्पादनांचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाजवळून त्यांचे अपहरण करण्यात आले. बंसरी यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही अपहरण करण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी आपली कशीतरी सुटका करून घेतली. अपहरणकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. पुनीत सिंह यांनी सांगितले की, बंसरी यांचे कुटुंबीय दिल्ली-एनसीआरमध्ये वास्तव्यास आहेत. स्थानिक तपास यंत्रणांनी बंसरी यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली असून त्यांच्या शोध घेतला जात आहे.