'काका-पुतण्याच्या टोळीने 'मुळशी पॅटर्न'द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

'काका-पुतण्याच्या टोळीने 'मुळशी पॅटर्न'द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली'

https://ift.tt/3lncbXy
पुणेः भाजप आमदार (Gopichand Padalkar) यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जेजुरी देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन पडळकरांनी शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जेजुरी देवस्थानच्या जमिनीबाबत महत्त्वाची माहिती देत पवारांचे नाव न घेता टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे. वाचाः गोपीचंद पडळकर ट्वीटमध्ये म्हणतात, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना परंपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी काका- पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पूर्वीच्या काळात देवस्थानच्या सेवांसाठी काम करणाऱ्या पुजाऱ्यांच्या नावे राजे-महाराजांकडून इनाम म्हणून जमिनी दिल्या जात होत्या. त्या जमिनी या देवस्थानच्या मालकीच्याच असून, त्या जमिनीवर संबंधित देवस्थानचीच मालक म्हणून नोंद होईल. इनाम म्हणून जमिनीवर वहिवाट करीत असल्यास त्यांना विक्रीचे अधिकार नाहीत; तसेच त्यावर मालकी हक्क दाखविता येणार नाही. देवस्थानची सेवा करीत नसलेल्या पुजाऱ्यांकडून ही जमीन काढून घेतली जाईल, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. वाचाः