अनिल कुंबळे पुन्हा होणार भारताचे मुख्य प्रशिक्षक? हे दोन दिग्गज देखील स्पर्धेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 18, 2021

अनिल कुंबळे पुन्हा होणार भारताचे मुख्य प्रशिक्षक? हे दोन दिग्गज देखील स्पर्धेत

https://ift.tt/3Cr8hUu
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवान हलचाली सुरू आहेत. विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर टीम इंडियात अचानक बदलाचे वारे सुरू झाले आहेत. नव्या कर्णधारासोबत नवा मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआय देखील त्याचा करार वाढढवण्याचा विचार करत नाही. यामुळेच आता नव्या कोचसाठी अनेक दावेदार समोर आले आहे. वाचा- बीसीसीआयचे प्रमुख आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीला त्याचा जुना सहकारी राहुल द्रवीडला मुख्य प्रशिक्षक करायचे आहे. अनेक प्रयत्न करुन देखील द्रवीड त्यासाठी तयार झाला नाही. आता बोर्ड दोन माजी दिग्गज खेळाडूंशी चर्चा करू शकते. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दिग्गज फिरकीपटू आणि दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मुख्य कोच पदासाठी अर्ज करण्यास सांगितले जाऊ शकते. वाचा- अनिल कुंबळे २०१६-१७ या एका वर्षाासाठी भारतीय संघाचे कोच होते. तेव्हा सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गांगुली यांच्या सल्लागार समितीने शास्त्रींच्या जागी कुंबळेची नियुक्ती केली होती. पण विराट कोहलीशी न पटल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कुंबळेंनी राजीनामा दिला. वाचा- नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर आले त्यात सुधारण्याची गरज आहे. विराट कोहलीच्या दबावात येऊन त्यांना हटवण्यात आले नव्हते. अर्थात सध्या देखील कुंबळे आणि लक्ष्मण हे प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास राजी होतात का हे देखील पाहावे लागले. सध्या तीन जण दावेदार अनिल कुंबळे आणि लक्ष्मण यांच्या शिवाय श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावाची देखील चर्चा आहे. आयपीएलमध्ये जयवर्धने मुंबई इंडियन्सचे कोच आहेत. मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले आहे. कुंबळे सध्या पंजाब किंग्जचे कोच आहेत. त्याच बरोबर ते आयसीसीच्या क्रिकेट काउंसिल समितीचे प्रमुख आहेत. लक्ष्मण आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाशी जोडला गेलाय.