इमिग्रेशन सेवेत वृद्धी ; 'अभिनव इमिग्रेशन'चे १५० कोटींचे महसुली उद्दिष्ट, IPO चे संकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 18, 2021

इमिग्रेशन सेवेत वृद्धी ; 'अभिनव इमिग्रेशन'चे १५० कोटींचे महसुली उद्दिष्ट, IPO चे संकेत

https://ift.tt/3Evc6cT
मुंबई : इमिग्रेशन सेवा क्षेत्रातील अभिनव इमिग्रेशनने पुढील पाच वर्षात १२५ ते १५० कोटींचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच बरोबर कंपनी विस्तार करणार असून कर्मचाऱ्यांची संख्या १००० पर्यंत वाढवणार असल्याचे अभिनव इमिग्रेशनचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी म्हटलं आहे. मागील २७ वर्षापासून व्हिजा आणि इमिग्रेशन व्यवसायात आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे कंपनीने कॉर्पोरेट आणि विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कंपनीने आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली असून तोपर्यंत महसुली उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. मागील २६ वर्षांपासून व्हिजा इमिग्रेशन इंडस्ट्रीजमध्ये अजय शर्मा काम करत आहेत. ते सांगतात काही महत्वपूर्ण सुधारणा या पुढे जाऊन व्हिजा सेवा क्षेत्रासाठी कलाटणी देणाऱ्या ठरल्या. जसे की १९९० च्या सुरुवातीला आलेली महामंदी, ११ सप्टेंबरचा दहशतवादी हल्ला आणि २००८ मध्ये आलेल्या मंदीने या क्षेत्राला कलाटणी मिळाली. या घटनांनी या उद्योगात परिवर्तन घडवले. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशांच्या सरकारांनी रात्रीच इमिग्रेशन नियमावलीमध्ये परिवर्तन करून सर्वानाच प्रभावित केले. शर्मा सांगतात की, इमिग्रेशन व्हिजा आणि प्रदेशात कन्सल्टिंग स्टडी इंडस्ट्रीला अजूनही भारतात नियमन केलेले नाही जे दुर्दैवी आहे. कारण याची उलाढाल खूप मोठी आहे. युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये जाणारे विद्यार्थी आणि प्रोफेशनल लोकांची संख्या मोठी आहे. या देशांमध्ये या इंडस्ट्रीला चांगल्या प्रकारे नियमन केले जाते. सरकारकडून त्यावर देखरेख ठेवली जाते मात्र भारतात असे काही नाही, असे शर्मा यांनी सांगितले. कॅनडामधील इमिग्रेशन नियमावली कठोर असल्याचे शर्मा सांगतात. तिथे इमिग्रेशन कन्सल्टन्सी सेवा देणाऱ्या भारतीय कंपन्यांना देखील आयईसीसीआरसी (कॅनडा सरकारची नियमावली) द्वारा स्थापित नियमावलीतून जावे लागते. त्यांचे एजंट म्हणून काम करावे लागते. मात्र ही यंत्रणा विविध पद्धतीने कंपन्यांद्वारे सोडवली जाते. जसे कि क्लाइंट ऍग्रिमेंट्स थेट कंपनीसोबत केले जातात. त्यामुळे या कंपन्या इमिग्रेशन सेवा देत नाहीत, असे गणले जाते. भारताबाहेरील बदललेल्या परिस्थितीबाबत शर्मा सांगतात की, डॉलर कमावण्याच्या उद्देशाने परदेशी स्थलांतरित होण्याची पद्धत सुरु झाली होती, मात्र नव्या शतकाच्या सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर लोकांनी मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास सुरुवात केली. दशकानंतर उत्तम जीवनशैली लोकांसाठी महत्वाची बनली. ताज्या परिस्थितीचा विचार केला तर महामारीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन लोक आता परदेशी जाण्याबाबत विचार करत आहेत, असे शर्मा यांनी सांगितले. नजीकच्या काळात विविध देशांमध्ये रहदारी वाढेल. त्यादृष्टीने इमिग्रेशन, परदेशी शिक्षण आणि व्हिजा कन्सल्टन्सी इंडस्ट्रीला नियमावली हवी. शर्मा हे त्या निवडक व्यक्तीपैकी एक आहेत ज्यांनी या उद्योगाला स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आता या उद्योगात नवनवीन उद्योजक येत आहेत जे इंटरनेट आणि डिजिटल दुनियेत निपुण आहेत. हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान ठरेल. आजकाल व्हिजा देण्यासाठी आणि व्हिजा कन्सल्टन्सीच्या कंपन्यांच्या हजारो वेबसाईटची बाजारात अक्षरशः लाट आली आहे. यातील काही कंपन्या भारतातील सर्वोत्तम तर काही कंपन्या जगातील सर्वोत्तम सेवा पुरवठादार असल्याचा दावा करतात.