अजिंक्य रहाणेला कधी संघाबाहेर करावे; माजी खेळाडूने सांगितली ही वेळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

अजिंक्य रहाणेला कधी संघाबाहेर करावे; माजी खेळाडूने सांगितली ही वेळ

https://ift.tt/2XlJfXh
नवी दिल्ली: भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसला तरी त्याला आणखी एक संधी मिळाली पाहिजे, असे मत माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे. अजिंक्यची गरज घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत अधिक असल्याचे सेहवाग म्हणाला. वाचा- अजिंक्य सध्या प्रचंड खराभ फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्य कसोटीनंतर त्याने एकही शतक झळकावलेले नाही. त्यानंतर त्याने १९.८६च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना सेहवाग म्हणाला, प्रत्येक खेळाडू खराब फार्ममधून जात असतो. प्रश्न हा असतो की त्यावेळी तुमच्या सोबतचे खेळाडू कसे वागतात. ते तुमच्या सोबत उभे राहतात की तुम्हाला सोडून जातात. माझ्या मते भारतातील पुढील कसोटी मालिकेत अजिंक्यला संधी मिळाली पाहिजे. जर भारतात देखील तो चांगला खेळू शकला नाही तर तेव्हा तुम्ही म्हणू शकता की, अजिंक्य तु दिलेल्या योगदानाबद्दल खुप खुप आभारी! वाचा- इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारताच्या मधळ्या फळीतील फलंदाज फार अपयशी ठरले. भारताच्या सलामीच्या जोडीमध्ये केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली. पण मधळ्या फळीतील चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना अपयश आले. मालिकेतील अखेरच्या काही डावात पुजारा लयमध्ये येत असल्याचे दिसत होते. पण अजिंक्यच्या बाबत तसे झाले नाही. एकेकाळी परदेशातील दौऱ्यात अजिंक्य हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज असायचा, पण आता तो खराब फॉर्ममध्ये आहे. वाचा- अजिंक्यबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला, मला वाटते की जेव्हा परदेशात तुम्ही कामगिरी खराब होते तेव्हा भारतात देखील तुम्हाला एक संधी मिळाली पाहिजे. परदेशात संबंधित देशात तुम्ही चार वर्षातून एकदा खेळता. पण भारतात तुम्ही प्रत्येक वर्षी खेळत असता. जर तो भारतात देखील खराब खेळला तर परदेशातील खराब फॉर्म अद्याप कायम असून तेव्हा तुम्ही त्याला संघातून बाहेर करू शकता. वाचा- मी असे अनेक महान खेळाडू पाहिले आहेत जे ८-९ कसोटी काहीच करत नाही. साधे अर्धशतक देखील करत नाही. पण तुम्ही त्याच्या सोबत राहता त्याचा परिणाम असा होतो की त्याची कामगिरी चांगली होते. ते खेळाडू कसोटीत एका वर्षात १२०० ते १५०० धावा करतात.