
सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री यांची त्यांच्या दरे तर्फ तांब या महाबळेश्वर तालुक्यातील गावी जाऊन भेट ( Met ) घेतली आहे. बुधवारीच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संभाजी भिडे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामे याबाबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीमधून नक्कीच वेगळी समीकरणे जुळणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भिडे यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी भेटीचं कारण सांगण्यास नकार दिला. संभाजी भिडे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड एका तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात काय उलथापालथ होणार, याबाबतचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, या भेटीवेळी मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे यांच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.