
मुंबई : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत तूर्त पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास राज्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे इंधन स्वस्त होण्याची शक्यता धूसर बनली आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही स्थिरआहेत . आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आठवड्याभरात कच्च्या तेलाचा भाव ३.३१ टक्क्याने वधारला आहे. अमेरिकेत शुक्रवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव ७५.३४ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७१.९७ डॉलरवर बंद झाला. अमेरिकेत चक्री वादळानंतर झालेल्या नुकसानीने तेल विहिरींना फटका बसला आहे. अजूनही तेथील कच्च्या तेलाचे उत्पादन पूर्ववत झालेले नाही. यापूर्वी ५ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैसे कपात केली होती. गेल्या महिन्यात १८ ते २० ऑगस्ट असे तीन सलग दिवस डिझेल दरात २० पैसे कपात केली होती. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर एकदा डिझेलमध्ये १५ पैसे आणि गेल्या बुधवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी १५ पैसे कपात करण्यात आली होती.