पॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलुट; उंच उडीत प्रवीण कुमारला रौप्यपदक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 3, 2021

पॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलुट; उंच उडीत प्रवीण कुमारला रौप्यपदक

https://ift.tt/38FX05L
टोकियोः टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लटलूट सुरूच असून उंच उडीत भारताच्या प्रवीण कुमारनं रौप्य पदक मिळवलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारात प्रवीणनं ही कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारतानं ११ पदकांची कमाई केली आहे. ग्रेट ब्रिटनच्या ब्रूम - एडवर्डस जोनाथन सोबत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रवीण कुमारनं रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. नोएडाच्या १८ वर्षीय प्रवीण कुमारनं उंच उडीत टी- ४४ गटात २ मीटर उंच उडी घेत पदकावर आपलं नाव कोरलं आहे. तर, ब्रूम एडवर्डसनं २. १० मीटर उंच उडी घेत सुवर्णपदक कमावलं. तर, कांस्य पदकावर पोलंडच्या लेपियाटो मासिएजो याला समाधान मानावं लागलं आहे. उंच उडीत भारताला चौथं पदक मिळालं आहे. याआधी भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावले. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात शरद कुमारने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. तर, निषाद कुमारनं टी- ४७ गटात नवा आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित करत रौप्य पदक जिंकलं आहे.