नवी दिल्ली : भारताला करोना संक्रमणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोक्या दरम्यान भारतातल्या पुन्हा एकदा जवळपास चार लाखांवर पोहचलीय. आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (२ सप्टेंबर २०२१) ४५ हजार ३५२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ३६६ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ८९५ वर पोहचलीय. देशात सध्या ३ लाख ९९ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३४ हजार ७९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६
- उपचार सुरू : ३ लाख ९९ हजार ७७८
- एकूण मृत्यू : ४ लाख ३९ हजार ८९५
- करोना लसीचे डोस दिले गेले : ६७ कोटी ०९ लाख ५९ हजार ९६८