नवी दिल्ली : विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी भारतीय ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण आता विराटने अजून एका संघाचे कर्णधारपद सोडले आहे. विराट कोहली आता आयपीएलमधील आरसीबी संघाचे कर्णधारपदही करणार नाही. हा विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधार म्हणून अखेरचा हंगाम असेल. आरसीबीने याबाबतचे ट्विट करत ही माहिती दिली आहे. विराटला आतापर्यंत एकदाही आरसीबीला जेतेपद मिळवून देता आलेले नाही. त्यामुळए विराटने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व गोष्टींची विराटच्या कारकिर्दीवर मोठा परीणाम होऊ शकतो. कारण काही दिवसांत दोन संघाचे कर्णधारपद सोडल्याने विराटची ब्रँड वॅल्ह्यू आता कमी होऊ शकते. त्यामुळए विराटला आता मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे विराटने घेतलेला हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलटही येऊ शकतो. त्यामुळे आता विराट यापुढे नेमकं काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण येत्या काही दिवसांनंतर विराटकडे फक्त भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद असणार आहे. त्यामुळे विराट आता या दोन कर्णधारपदांना कसा न्याय देतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आता आयपीएल आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर विराटची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. विराटचे दडपण कधी आणि कसे वाढत गेले , पाहा... भारताला न्यूझीलंडकडून विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतर कोहलीने स्वत:वरील नियंत्रण गमावले होते, असे संघातील खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितले होते. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितले की, " न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट अति रागीट झाला होता. यावेळी तो संघातील खेळाडूंबरोबर चांगल्यापद्धतीने बोलत नव्हता. त्यामुळे कोहलीने एक कर्णधार म्हणून आपला सन्मान गमवायला सुरुवात केली होती. कारण त्यावेळी तो कोणाचेच ऐकत नव्हता. काही खेळाडूंबरोबर बोलताना तर विराटने आपले लिमीटही क्रॉस केले होते. त्याचवेळी विराट हा खेळाडूंच्या मनातून उतरला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयचे दार ठोठावले आणि त्याच्या या वागण्याबाबत तक्रार केली.