चंदीगड : काँग्रेस नेतृत्वाकडून पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची पेच कसाबसा सोडवण्यात आला असला तरी पंजाब काँग्रेसमधील धुसपूस अद्याप संपलेली नसल्याचंच दिसून येतंय. काँग्रेस नेतृत्वाकडून मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर असलेलं आपलं नाव डावलून काँग्रेस नेतृत्वानं चन्नी यांना दिलेली संधी आणि काँग्रेस नेतृत्वाचा पुढची रणनीती यांना काही रुचलेली दिसत नाही. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या जाखड यांनी यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असं वक्तव्य हरीश रावत यांनी केलं होतं. यावर, 'हरीश रावत यांचं हे वक्तव्य म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांचं अधिकार क्षेत्र कमी करण्यासारखं' असल्याचं वक्तव्य सुनील जाखड यांनी केलंय. 'चरणजीत सिंह चन्नी यांच्या शपथविधीच्या दिवशीच हरीश रावत यांनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे. हे मुख्यमंत्र्यांची ताकद कमी करण्यासारखं आहे आणि सोबतच यामुळे कुणाच्या नियुक्तीवरही प्रश्नचिही उभं करतं', असं ट्विट सुनील जाखड यांनी केलंय. 'मुख्यमंत्रीपदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांच्याविषयी अगोदरपासून नेतृत्वाचा निर्णय झालाय. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा कोण असेल यावर काँग्रेस अध्यक्ष निर्णय घेतील. सद्य परिस्थिती लक्षात घेतली तर आगामी निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाऊ शकते', असं वक्तव्य पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी केलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, याच दरम्यान सुनील जाखड यांचा भाचा अजयवीर जाखड यांनी पंजाब शेतकरी आयोगाच्या पदाचा आपला राजीनामा सोपवला आहे.