BBM 3 - कोण आहे मराठी शाळेत शिकलेली मिनल 'शाह' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 20, 2021

BBM 3 - कोण आहे मराठी शाळेत शिकलेली मिनल 'शाह'

https://ift.tt/2XH7SOH
मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस'. हिंदीमधील ‘बिग बॉस ओटीटी’ संपून आता मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणाऱ्या बिग बॉस मराठी सीजन ३ च्या स्पर्धकांवरून आता पडदा उठला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर नशीब आजमावणाऱ्या अनेक बिलंदर कलाकारांचा या पर्वात समावेश आहे. यात मुंबईची मराठमोळी मुलगी मीनल शहा हिचा देखील समावेश आहे. आता साऱ्यांनाच प्रश्न पडेल की 'शाह' असून ती मराठमोळी कशी.. मीनलचे शालेय शिक्षण हे वांद्रे पूर्व येथील आयईएस न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मराठी माध्यमात झाले आहे. तिची आई मराठी असल्यामुळे, लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृती आणि भाषेचं प्रभुत्व आहे. 'मी लहान असताना माझे आई वडील वेगळे झाले होते, तेव्हापासून मी आणि माझा भाऊ आईसोबत राहत आहे. वडील गुजराती जरी असले तरी आई मराठी असल्यामुळे तिने आमच्यावर लहानपणापासून मराठी संस्कार केलेयत. त्यामुळे मुंबईतील एका सामान्य मराठी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला असल्याचे मी मानते.' असे मीनल सांगते. मीनल ही एमटीव्ही रोडीज स्टार असून, तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती. त्यामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरात मीनल काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.