११ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीचं नाव समोर आल्यानंतर गावात खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

११ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीचं नाव समोर आल्यानंतर गावात खळबळ

https://ift.tt/3kevCCf
: जावळी तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलीवर अत्याचार करणारा ६५ वर्षाचा वृद्ध असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मेढा पोलीस स्थानकात बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५, रा. नेवेकरवाडी, तालुका जावळी) या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणारा संशयित आरोपी बबलिंग उर्फ बबन सपकाळ हा पीडित मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर खेळत असतानाच तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि सदर अल्पवयीन मुलीवर केला. अत्याचारानंतर याबाबत बाहेर कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही या नराधमाने पीडित मुलीला दिली. मात्र मुलीने मोठ्या धाडसाने यासंदर्भात घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सपकाळ याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणाची अधिक चौकशी व तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.