महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंबईतून संशयित दहशतवादी ताब्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 18, 2021

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंबईतून संशयित दहशतवादी ताब्यात

https://ift.tt/3nRKhWa
मुंबईः नवरात्र, रामलीला आणि उत्सवकाळात देशात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना विशेष पोलिस पथकाने अटक केल्यानंतर आता मुंबईतही एटीएसनं मोठी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली आहे. ( detained one person in Mumbai) गणेशोत्सवाच्या काळात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या एका दहशतवाद्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले होते. जान मोहम्मद अली शेख यांचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली होती. त्यानंतर आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनआयएन या न्यूज एजन्सीनं याबाबत वृत्त दिलं आहे. वाचाः महाराष्ट्र एटीएसनं जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्या व्यक्तीचे नाव झाकीर असं आहे. आणि मुंबई पोलिस यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा घातपाताचा कट उधळला होता. ६ दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. त्याच प्रकरणात झाकीरलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या जाकीरचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन असल्याची माहिती आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबतही झाकीरचे संबंध होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जान मोहम्मदनं झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते, अशी माहिती सांगण्यात येते.