एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 3, 2021

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

https://ift.tt/3BzzS5e
म. टा. प्रतिनिधी, मुंबई आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश यांनी गुरुवारी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १,४५० कोटी रु.च्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८३८ कोटी रु.चा निधी एसटीला आधीच वितरित करण्यात आला आहे. उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रु. तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले होते. त्यानंतर तो वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करीत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.