... कर्णधार असा हवा, विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्माचा एकच व्हिडीओ होतोय व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

... कर्णधार असा हवा, विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्माचा एकच व्हिडीओ होतोय व्हायरल

https://ift.tt/2YY3IlP
मुंबई : सध्याच्या घडीला विराट कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहलीने आज ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारताचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रोहितचा हा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित आणि कोहली यांच्यामध्ये भारतीय संघात विस्तवही जात नव्हता, असे म्हटले जात होते. रोहितने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या कामगिरीवर भारताच्या संघाची निवड केली जाते, मग रोहितकडे ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद का नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. त्याचबरोबर रोहित तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव त्याच्या गाठिशी आहे. त्यामुळे विराटने कर्णधारपद सोडल्यावर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व रोहितकडेच येणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता रोहितचे चाहतेही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेळा विराट आणि रोहित शर्माची तुलना केली जात असे. त्यातच रोहितने आयपीएलचे ५ विजेतेपद मिळवली आहेत आणि विराटला अद्याप एकही मिळाले नाही यावरून देखील चर्चा सुरू होती. त्यामुळे आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहलीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विश्वचषकात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर विराट कोहलीने नेमकं काय म्हटलं, पाहा... " गेली ८-९ वर्षे मी भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्याचबरोबर गेल्या ५-६ वर्षांपासून मी तिन्ही क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कामाचा ताण वाढलेला आहे आणि तोच मला कमी करायचा आहे. त्यामुळे मी ट्वेन्टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडत आहे. यापुढे मी ट्वेन्टी-२० संघात एक फलंदाज म्हणून असेल. पण कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये मी भारताचे नेतृत्व करत राहीन," असे कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यावर सांगितले.