अनिल देशमुखांना 'लूकआऊट' नोटीस; 'ईडी'ची अटकेची तयारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 6, 2021

अनिल देशमुखांना 'लूकआऊट' नोटीस; 'ईडी'ची अटकेची तयारी

https://ift.tt/3A06LYg
म. टा. प्रतिनिधी, : खंडणी आरोप प्रकरणात यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) देशमुख यांच्या अटकेची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशमुख यांना सहावे समन्सही बजावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी आगामी आठवडा महत्त्वाचा असेल. गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. या आरोपासंबंधी 'ईडी'ने तपास सुरू केला. त्यामध्ये साडेचार कोटी रुपयांची खंडणी देशमुखांना मिळाल्याची ठोस माहिती 'ईडी'च्या हाती आली आहे, तर जवळपास ४० कोटी रुपयांची खंडणी बारमालकांकडून मिळाल्यासंबंधी 'ईडी'ने जोमाने तपास सुरू केला आहे. त्यासंबंधी 'ईडी'ला अनिल देशमुख यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यांनी पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले; पण देशमुख गैरहजर राहिले. १४ ठिकाणी छापा टाकल्यानंतरही त्यांचा शोध 'ईडी'ला घेता आलेला नाही. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीनंतर आता या आठवड्यात 'ईडी'कडून देशमुख यांच्या अटकेच्या हालचाली होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अटक वॉरंट किंवा सहावे समन्स देशमुखांना बजावले जाईल, असे 'ईडी'तील सूत्रांचे म्हणणे आहे. कोठडीसंबंधी आज निर्णय? प्रकरणाशी संबंधित गोपनीय दस्तावेज लाच देऊन मिळवल्याबद्दल व बनावट अहवाल व्हायरल केल्याप्रकरणी देशमुख यांचे वकील आनंद डागा सीबीआयच्या अटकेत आहेत. त्यांच्या कोठडीसंबंधी आज, सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. कोठडी वाढवली गेल्यास देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्याभोवती सीबीआयकडून चौकशीचा फास आवळला जाऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.