
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहावे, यासाठी सत्ताधारी आघाडी आणि विरोधी बाकांवरील भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बहुजन व ओबीसी विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती शोधून काढण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर पडळकर हे अज्ञानी बालक आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसनेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेले गवत आहे. त्यांना या प्रश्नांचे काय ज्ञान आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्यावर टीका केली. पडळकर यांना अजून आपले मूळ सापडलेले नाही. अबाधित राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसाठी मी समिती स्थापन केली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडे हरवलेली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सचे नेमण्याची मागणी आपण केली आहे, असे पडळकर म्हणाले. निष्क्रिय दिग्गजांच्या मंत्रिमंडळ उपसमितीमधून एका तरी मंत्र्याला जाग आली तर बरे आहे. किंबहुना, आपण म्हणता ते खरे आहे. कारण मला ओबीसीहितासाठी स्थापन झालेल्या महाज्योतीचे अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लगावला आहे.