पंतप्रधान मोदींचा ७१ वाढदिवस : देशभरातून शुभेच्छांची उधळण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

पंतप्रधान मोदींचा ७१ वाढदिवस : देशभरातून शुभेच्छांची उधळण

https://ift.tt/3AmAPgY
नवी दिल्ली : आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं भाजपकडून येत्या २० दिवसांपर्यंत '' राबवण्यात येणार आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदींवर देशातूनच नाही तर जगभरातून शुभेच्छांची उधळण करण्यात येतेय. राष्ट्रपती , उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, गृहमंत्री , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निरोगी राहून दीर्घायुष्य प्राप्त करत आपल्या 'अहर्निश सेवामाहे' भावनेनं राष्ट्रसेवेचं कार्य करत राहण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची कामना करतो. मोदींच्या रुपात देशाला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय. काही दशकांपासून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या कोट्यवधी गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडून केवळ त्यांना समाजात सन्माननीय स्थान दिलं नाही तर एका प्रजावत्सल नेतृत्वाचं उदाहरणच त्यांनी जगासमोर मांडलं' अशा शब्दांत अमित शहा यांनी मोदींचं या निमित्तानं कौतुक केलंय. राजनाथ सिंह, जे पी नड्डा, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदींच्या निरोगी आयुष्य आणि भरभराटीची कामना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदीजी' असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपच्या 'सेवा आणि समर्पण' मोहिमेला प्रत्यूत्तर म्हणून यूथ काँग्रेसकडून आज 'राष्ट्रीय बेरोजगारी दिवस' साजरा केला जातोय.