संसद टीव्ही लाँच; संसद ही राजकारणापेक्षा अधिक धोरणांसाठीः PM मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 16, 2021

संसद टीव्ही लाँच; संसद ही राजकारणापेक्षा अधिक धोरणांसाठीः PM मोदी

https://ift.tt/3hDUlON
नवी दिल्लीः 'संसद फक्त राजकारणासाठी ( ) नाही, तर धोरणही ठरवलं जातं. कंटेंट हा कनेक्ट ( ) करतो. ही गोष्ट मीडियाला जशी लागू पडते, तशी ती संसदीय व्यवस्थेलाही लागू होते', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळवून बनवण्यात आलेली 'संसद टीव्ही' लाँच केलीय. त्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह लाँच केली. माध्यम क्षेत्रात सामान्यपणे कंटेंट सर्वतोपरी असतो. पण 'कंटेंट इज कनेक्ट' असं आपलं मत आहे. जेव्हा आपल्याकडे चांगला कंटेंट असतो तेव्हा जनता स्वतः आपल्यासोबत येते. ही बाब मीडिया जेवढी लागू पडते तेवढीच ती आपल्या संसदीय व्यवस्थेलाही लागू होते. कारण संसदेत फक्त राजकारण नाही तर धोरणंही ठरवली जातात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. संसद टीव्हीच्या माध्यमातून देशाला आज एक संवादाचे माध्यमा मिळाले आहे. हे माध्यम देशाची लोकशाही आणि लोकप्रतिनिधींचा आवाज म्हणून काम करेल. वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीत मीडिया आणि टीव्ही चॅनेल्सची भूमिकाही वेगाने बदलत आहे. २१ वे शतक हे खासकरून प्रसार आणि संवादातून क्रांती आणत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. संसदेशी संबंधित चॅनेल्सही आधुनिक व्यवस्थेनुसार बदलले पाहिजेत. संसद टीव्हीच्या माध्यमातून एक नवी सुरवात झाली आहे. आपल्या आधुनिक स्वरुपात ते सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही येईल. त्याचे आपले एक अॅपही असेल, अशी माहिती मोदींनी दिली. भारतासाठी लोकशाही एक व्यवस्था नाही तर एक विचार आहे. भारतात लोकशाही ही फक्त घटनात्मक रचना नाही तर एक भावना आहे. देशात लोकशाही ही राज्यघटनेच्या कलमांचा संग्रह नाही तर एक जीवनवाहिनी आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त संसद टीव्ही लाँच होणं हे अतिशय समर्पक आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.