इंधन महागाईचे चटके ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 4, 2021

इंधन महागाईचे चटके ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

https://ift.tt/3l4oDfN
मुंबई : सलग चार दिवस इंधन दरवाढ केल्यानंतर आज सोमवारी कंपन्यांनी दरवाढीला तूर्त ब्रेक लावला. आज पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर स्थिर आहेत. मात्र आठ दिवसांत झालेल्या दरवाढीने नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या तेलातील महागाईने नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती. मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. आज मुंबईत एक लीटर १०७.९५ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.९५ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.५८ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.४७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.३७ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.४४ रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर ९७.८४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९०.१७ रुपये आहे. चेन्नईत ९४.७४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.२७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९९.०९ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.७० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.३० डाॅलरने कमी होऊन ७८.९८ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव मात्र ०.३३ डाॅलरने घसरला आणि तो ७५.५५ डाॅलर प्रती बॅरल झाला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.