Shocking! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं घेतलं ताब्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 3, 2021

Shocking! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं घेतलं ताब्यात

https://ift.tt/2YkwTQe
मुंबई: बॉलिवूडमधून पुन्हा एकदा धक्कादायक अशी माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतून गोव्याला निघालेल्या एका मोठ्या क्रूझवर मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने () मोठी कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग याचा मुलगा यालाही एनसीबीनं चौकशी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून एनसीबीची ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुमारे ७ तास सरू होती अशी माहिती आहे. असा रचला गेला सापळा एनसीबीच्या पथकातील काही कर्मचारी क्रूझवर प्रवासी बनून गेले होते. त्यामुळं कोणालाही त्यांचा संशय आला नाही. या पथकानं ड्रगचे सेवन करणाऱ्यांना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या या ऑपरेशनदरम्यान आर्यन खान व्यतिरिक्त आणखी १० जणांना अटक करण्यात आली आहे.