सिलिंडरमधून गॅसगळती सुरू झाल्याने अचानक घराला लागली आग आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 23, 2021

सिलिंडरमधून गॅसगळती सुरू झाल्याने अचानक घराला लागली आग आणि...

https://ift.tt/3kWtj6L
: घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील साहित्याची जळून राख झाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. ढेगज येथील तुकाराम राठोड यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. मोठ्या कष्टाने उभा केलेल्या घराची राखरांगोळी झाल्याने राठोड कुटुंबाला धक्का बसला आहे. घरात गॅस सिलिंडर लीक झाल्याने आग लागली आणि पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले. आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा केला. हा प्रकार शेतातील आखाड्यावर घडल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या कुटुंबाने प्रसंगावधान दाखवत आपला जीव वाचवला आहे. मात्र कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे व इतर सामानाची राखरांगोळी झाली आहे.