राज्यातील आणखी एका जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 17, 2021

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

https://ift.tt/3FnRZNC
: जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. सदर आदेश १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून ते ३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रपूरकरांच्या हालचालींवर आता मर्यादा आल्या आहेत. त्रिपुरा येथील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून कडक पाऊल उचलले जात आहे. गडचिरोलीत पोलिसांच्या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही. या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसंच पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी तसंच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व(३) लागू करण्यात आलं आहे.