तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आमिर खान, वधूसाठी 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 22, 2021

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आमिर खान, वधूसाठी 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत

https://ift.tt/3r32bXX
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर आमिर लवकरचं तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर आता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढायला आतुर झाला आहे. आमिरचा 'लाल सिंह चड्डा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लाल सिंह चड्डा' च्या प्रदर्शनानंतर आमिर चाहत्यांना ही आनंदाची बातमी देणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. आता आमिरची तिसरी पत्नी कोण, असा मोठा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांच्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली. तेव्हापासून आमिर बॅचलर लाइफ जगत होता. किरण आणि आमिर यांनी २००५ साली लग्न केलं होतं. किरण आणि आमिर यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. किरणचं आमिरच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसोबतचं नातं देखील खूप चांगलं आहे. परंतु, आमिरच्या दुसऱ्या अभिनेत्रीसोबतच्या संबंधांमुळे किरण आणि आमिर यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री होती 'दंगल' फेम फातिमा सना शेख. फातिमा आणि आमिर यांच्यातील वाढत्या जवळिकीबद्दलही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. फातिमाने या गोष्टीला कायम नकार दिला. मात्र आता जेव्हा आमिरच्या तिसऱ्या लग्नाची बातमी नेटकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे तेव्हा आमिरची तिसरी पत्नी फातिमा असल्याचं बोललं जातंय. आता आमिर कधी आणि कोणासोबत लग्न करणार हे लवकरच कळणार असलं तरी आमिरच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे मात्र नक्की.