जव्हार आगार कर्मचारीनि आत्महत्येचा प्रयत्न केला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

जव्हार आगार कर्मचारीनि आत्महत्येचा प्रयत्न केला

 

 


जव्हार आगारातील एसटी कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांसह संपात उतरले आहेत. या संपात उतरलेल्या वाहक दिपक रमेश खोरगडे  यांनी शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास संपाबाबत सरकार तोडगा काढत नसल्याने आणि कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची या चिंतेतून घरी जाऊन विष पीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.


या घटनेनंतर खोरगडे यांना तातडीने जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलिस आणि आगार व्यवस्थापक हे रुग्णालयात दाखल झाले. घटनेची माहिती घेतली जात असून संबंधिताचा जबाब घेतला जात असल्याची माहिती यावेळी जव्हारचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.