पहिल्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासहऑस्ट्रेलियाचा धमाका ; फक्त ३ तासात दोन विक्रम मोडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 15, 2021

पहिल्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासहऑस्ट्रेलियाचा धमाका ; फक्त ३ तासात दोन विक्रम मोडले

https://ift.tt/3qzQpUD
दुबई: ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांचा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने कर्णधार केन विलियमसनच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात १७२ धावा केल्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर शानदार विजय साकारला. वाचा- ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने फक्त ३८ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५३ धावा केल्या. तर मिचेल मार्शने ५० चेंडूत नाबाद ७७ धावा करून ऑस्ट्रेलियाला पहिले विजेतेपद मिळून दिले. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत नाबाद २८ धावांचे योगदान दिले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने १७२ धावा करत टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यांनी २०१६ साली वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध केलेल्या १६१ धावांचा विक्रम मोडला. न्यूझीलंडने केलेली धावसंख्या आव्हानात्मक होती. पण या स्पर्धेचा इतिहास पाहता जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतो तोच संघ विजय मिळवतो. या सामन्यात देखील तसेच घडले. वाचा- न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने टी-२० वर्ल्डपकच्या फायलनमधील सर्वाधिक धावाचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. न्यूझीलंड संघाने काही तासांपूर्वी केलेला विक्रम ऑस्ट्रेलियाने मोडीत काढला. संघिक विक्रमासोबत या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्श ३१ चेंडू अर्धशतक केले. टी-२० वर्ल्डकप फायनलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. याआधी हा विक्रम याच सामन्यात केन विलियमसनने केला होता. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक केले होते. केनने २०१४ श्रीलंकेच्या कुमार संघकाराने ३३ चेंडूत केलेला विक्रम मोडला होता.